जन्मदा

ebook Janmadaa · E2

By Vinita Ainapure

cover image of जन्मदा

Sign up to save your library

With an OverDrive account, you can save your favorite libraries for at-a-glance information about availability. Find out more about OverDrive accounts.

   Not today
Libby_app_icon.svg

Find this title in Libby, the library reading app by OverDrive.

app-store-button-en.svg play-store-badge-en.svg
LibbyDevices.png

Search for a digital library with this title

Title found at these libraries:

Loading...

नराधम ही विनीता ऐनापुरे यांनी लिहिलेली कादंबरी १९८९ साली प्रसिद्ध झाली. सदर कादंबरी ८०च्या दशकात पुण्यात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.

लग्नानंतर सुमारे १० वर्षं अपत्यप्राप्ती न झालेलं एक जोडपं आपलं एक मूल असावं म्हणून अमानुष क्लुप्ती लढवतं व एका तरुणीचं आयुष्य उध्वस्त करतं ह्याचं चित्रण करणारी ही छोटेखानी कादंबरी.

कादंबरीतील मुख्य पात्र मनोहर लेले ह्याला उद्देशून वापरलेलं "नराधम" हेच विशेषण कादंबरीचं नाव ठरलं.

मात्र, जसजसा कादंबरीचा विषय गाजू लागला आणि ह्या कादंबरीवर आधारित "कुसुम मनोहर लेले" हे नाटक '९६मधे रंगमंचावर आल्यावर हा विषय प्रचंड गाजून कादंबरीच्या नावात बदल करायच्या सूचना येऊ लागल्या. कारण, मनोहर लेलेचं दुष्कृत्य त्याचं एकट्याचं नव्हतंच. त्याच्या घरातल्या स्त्रियांचीही त्याला साथ होती. त्याच्या गैरकृत्यांमुळे सुजाता देशमुखला आपलं तान्हं बाळ गमवावं लागलं.

एका दुर्दैवी "जन्मदे"ची ही मनाला चटका लावणारी सत्यकथा !

म्हणून, २००७मधे ह्या कादंबरीची नवीन आवृत्ती प्रसिद्ध होताना तिचं जन्मदा असं नामकरण झालं.

ही "जन्मदा" आता ई बुक स्वरूपात उपलब्ध.

जन्मदा